नवी दिल्ली,दि.८: सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला मोठा झटका दिला आहे. बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दणका दिला आहे. गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.
गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात ऑगस्ट २०२२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व ११ दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
२००२ मधील गुजरात येथील जातीय दंगलीत बिल्किस बानोवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींना माफी देण्यास गुजरात राज्य सरकार सक्षम नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. जस्टीस बीव्ही नागरत्न आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निकाल दिला.
न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आणि म्हटले की, बिल्किस बानोची ११ दोषींच्या लवकर सुटकेला आव्हान देणारी याचिका वैध आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दोन्ही राज्यांच्या (महाराष्ट्र-गुजरात) कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निर्णय घेतले आहेत. अशा स्थितीत यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही.
 
            
