Alia Bhatt Deepfake Video: अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा ‘डीपफेक’ची शिकार

0

मुंबई,दि.27: अलिकडच्या काळात AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या कोणत्या सिनेमामुळे चर्चेत न येता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री ‘डिपफेक’ची शिकार झाल्याचं म्हटलं जात आहे. ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर चाहत्यांची चिंता वाढली आहे. (Alia Bhatt Deepfake Video)

आलिया भट्ट ‘डिपफेक’ची शिकार

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सध्या ‘डिपफेक’च्या शिकार होत आहेत. आता यात आलिया भट्टचाही समावेश करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिन्ट असलेला ड्रेस परिधान केलेली एक मुलगी कॅमेऱ्यासमोर अश्लील चाळे करताना दिसत आहे. खरंतर, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत असलेली मुलगी आलिया भट्ट नाही आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा गैरवापर करण्यात आला आहे.

आलिया भट्टआधी रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, काजोल, सारा तेडुंलकर आणि रतन टाटासारखे अनेक सेलिब्रिटी डिपफेकचे शिकार झाले आहेत. रश्मिका मंदानाने डिपफेकची शिकार झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत चिंता व्यक्त केली होती. अभिनेत्री म्हणालेली,” माझ्यासाठी नव्हे तर प्रत्येकासाठी हे खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून जे माझ्या पाठिशी आहेत त्यांचे मी आभार मानते.

आलिया भट्टच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहतानाच हा एडिटेड व्हिडीओ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आलियाच्या चेहऱ्याचा वापर केलेली मुलगी नक्की कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here