सोलापूर,दि.30: BJP Mission 45: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बुथ बैठका, पदाधिकारी मेळावे आणि आढावा बैठक घेण्यात येत आहे. मिशन 45 साठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मिशन 45 प्लससाठी भाजपनं मोठी खेळी केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपमधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोलापूरमधून यांना मिळणार उमेदवारी? | BJP Mission 45
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 45 हून अधिक जागा जिंकण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. त्यासाठी सोबतीला एकनाथ शिंदे, अजित पवारांसारखे नेते घेतले आहेत. आता भाजपा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात महाराष्ट्रातील ६-७ दिग्गज आमदारांना उतरवण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठीचंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रविंद्र चव्हाण, आणि दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर लोकसभेची उमेदवारी ठरणार आहे असं देखील भाजपमधील सूत्रांनी सांगितलं. या नेत्यांची मतदारसंघातील लोकप्रियता, जातीय समीकरणे पाहून या आमदारांना लोकसभेचे तिकीट दिले जाईल अशी चर्चा सुरू आहे.
अलीकडेच मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत 3 केंद्रीय मंत्री, 4 खासदारांना आमदारकीचे तिकीट भाजपाने दिले. याच धर्तीवर जिंकून येण्याची क्षमता हा निकष ठेवून भाजपा उमेदवारी देणार आहे. इतकेच नाही सध्या मित्रपक्ष असलेल्या खासदारांच्या मतदारसंघातही भाजपाने उमेदवारासाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपाने सर्व्हेक्षण केले. त्यात प्रचाराची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असतील. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या मतदारसंघात गुंतवणूक ठेवले जाणार नाही. राज्यात 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.