iPhone 15 साठी ग्राहक दुकानदार यांच्यात तुफान राडा

0
Iphone 15 साठी राडा

नवी दिल्ली,दि.25: iPhone 15 साठी ग्राहक दुकानदार यांच्यात तुफान राडा झाला आहे. आयफोनची (Iphone) क्रेझ जबरदस्त आहे. आयफोन मोबाईलची विक्री सुरु झाल्यापासून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. आता त्याच्या खरेदीसाठी लाथा-बुक्क्यांची झाली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण भारतात झाली आहे. दिल्लीच्या (Delhi) कमला नगर मार्केटमध्ये हा वाद झाला आहे. दुकानदाराकडून ग्राहकाला मोबाईल देण्यास उशिर केल्यामुळे हा वाद झाला आहे. हा वाद बोलण्यातून इतका वाढत गेला की, मोबाईलच्या दुकानात हाणामारी सुरु झाली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

iPhone 15 साठी ग्राहक दुकानदार यांच्यात तुफान राडा

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, ग्राहक आणि दुकानाचा चालक या दोघांमध्ये हाणामारी सुरु आहे. या दोघांचं भांडणं पाहून तिथं लोकं जमा झाली आहे. त्याचबरोबर त्यातली काही लोकं हे भांडण सोडवण्यासाठी दुकानात घुसली आहेत.या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत. दिल्ली पोलिसांनी दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आयफोन विक्रीला उशिर झाल्यामुळे दोघांच्यात तुफान राडा झाला आहे.

लोकं सांगत आहे की, आयफोनच्या विक्रीला उशिर झाल्यामुळे ग्राहकाने दुकानातील कर्मचाऱ्यांना चांगलीचं मारहाण केली आहे. ज्यावेळी ग्राहकाने मारहाण केली, त्यानंतर कर्मचाऱ्याने सुध्दा मारहाण केली. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक्स वरती शेअर करीत असताना लिहीलं आहे की, दिल्लीतील कमला नगर परिसरातील iPhone 15 दुकानात ही मारामारी झाली आहे. दोघांच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here