Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मायभूमीत परत येणार

0

मुंबई,दि.8: अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Wagh Nakh) लवकरच मायभूमीत परत येणार आहे. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही लंडनमध्ये आहेत. ती महाराष्ट्रातपरत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहे. माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

वाघनखं महाराष्ट्रात येणार परत | Wagh Nakh

या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मनुगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.

या दिवशी वाघनखे मायभूमीत परत आणण्याचा विचार

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यादिवशीच परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदू तिथीनुसार आणण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच इतर तारखांचा देखील विचार केला जात आहे. ग्रेगोरियन कँलेंडरनुसार अफजल खानाचा वध केल्याची तारीख 10 नोव्हेंबर आहे. हिंदू तिथीनुसार येणाऱ्या तारखांचा देखील विचर करण्यात येत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात 2024 देशातील लोकसभा आणि अनेक राज्यातील निवडणुका देखील आहेत. या पार्श्वभूमीवर महाराजांची ही तलवार देशात राज्यात येणं ही फार महत्त्वाची बाब आहे. गेले काँग्रेस सरकार इतक्या वर्षात हे करु शकले नाही ते भाजप सरकार आणेल आणि याचे क्रेडिट हे सरकार घेईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here