Job Fair: शासन आपल्या दारी कार्यक्रमातंर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

सोलापूर,दि.19: Job Fair: शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयाच्या वतीने दिनांक 27 जुलै 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

रोजगार मेळावा | Job Fair

जिल्हयातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या रोजगार मेळव्यात 10 वी , 12 वी , आय.टी.आय. डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी , इलेक्ट्रीशीयन, नर्सिंग, बी.कॉम, एम.एस.डब्ल्यू. अशा प्रकारची एकुण 580 पेक्षा जास्त रिक्त पदे गंगामाई हॉस्पिटल व वर्क फोर्स सेंटर प्रा.लि. सोलापूर या उद्योजकांनी आधिसुचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह गुरूवार दि. 27 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र , नॉर्थ कोट, पार्क चौक , सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीव्दारे जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here