Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे यांनी घेतली अजित पवार यांची भेट म्हणाले…

0

मुंबई,दि.१९: Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उध्दव ठाकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्षांची बैठक बंगळुरुत पार पडली. या पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीचं नाव INDIA असं आहे. मी जे दोन शब्द बोललो त्यात मी विशद केलं आहे की एका पक्षाविरोधात किंवा व्यक्ती विरोधात नाही. तर हुकूमशाहीच्या विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदावर लोक येतात आणि जातात. मात्र जो पायंडा पडतो आहे तो घातक आहे. जे देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी लोक या विरोधात एकत्र आले आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच अजित पवारांचं कौतुकही केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट | Uddhav Thackeray Meets Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या. सध्या जी काही सत्तेची साठमारी चालली आहे त्यात राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाऊस सुरु झाला आहे, पूर स्थिती आहे. शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला होता, आता कदाचित अतिवृष्टीमुळे हवालदिल होईल. मात्र सत्तेची साठमारी सुरु आहे अशात जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंतीही मी अजित पवार यांना केली आहे. असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

अजित पवार हे अडीच वर्षे माझ्या बरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरु असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत परत त्यामुळे हे शक्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

अजित पवारांबाबत सांगत शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले होते. आता तेच त्यांच्यासह सत्तेत आहेत याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की हे सगळं जनतेला समजतं आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या वाक्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केला. सरकार स्थापन झाल्यावर नांदा सौख्य भरे या शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्या अजित पवारांमुळे शिवसेनेचा एक गट गुवाहाटीला गेला, आता तेच अजित पवार सत्तेत आले आहेत. मग खरं कोण आणि खोटं कोण य़ा प्रश्नावर हे समजायला जनता मुर्ख नाहीय, असे ठाकरे म्हणाले. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी असे किळसवाने आणि बिभत्स व्हिडीओ पाहत नाही. परंतू, काल राज्यातील महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here