नवी दिल्ली,दि.18: Fact Check: रेशन कार्डवर मोदी सरकार 2 स्मार्टफोनसह 10,200 रुपये देणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. मोदी सरकार अन्नधान्य रेशन कार्डवर मोफत देत आहे. केंद्र सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. ज्यात गरिबांना धान्य मोफत देणे, गॅस कनेक्शन देणे आदी योजना राबविल्या आहेत. काही योजना ग्रामीण भागातील जनतेला मोठा लाभ मिळवून देतात. उज्ज्वला योजना असो वा जनधन सारख्या सरकारी योजना, या योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. गोरगरिब वर्गातील जनतेला, मध्यमवर्गीय कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत आहे. सध्या सोशल मीडियावर एका मॅसेज व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी जोरदार योजना सुरु केल्याचा दावा करण्यात येत आहे. या योजनेमुळे रेशन कार्डधारकांना घबाड हाती येणार आहे. मोदी सरकार 2 स्मार्टफोनसह 10,200 रुपये देणार असल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे. (Free Smartphone Fact Check)
काय आहे दावा? | Free Smartphone Fact Check
सध्या सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी सरकारच्या नवीन योजनेविषयी दावा करण्यात आला. फ्री स्मार्टफोन योजना, असे तिचे नाव आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकार रेशन कार्डधारकांना मोफत स्मार्टफोनचे वाटप करणार आहे.
हेही वाचा Kirit Somaiya Video: आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया म्हणाले…
व्हायरल पोस्टमध्ये योजनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मोदी सरकारने गरीब आणि मध्यमवर्गासाठी खास योजना आणली आहे. या योजनेतंर्गत रेशन कार्डधारक कुटुंबातील दोघांना एक एक स्मार्टफोन देण्यात येणार आहे. तसेच त्यांना 10,200 रुपये पण देण्यात येणार आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
काय आहे सत्य | Fact Check
या व्हायरल मॅसेजची लागलीच पडताळणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले. इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा मॅसेज खोटा असल्याचे समोर आले. मोदी सरकार अशी कोणती ही योजना चालवत नसल्याचे. असा कोणताही प्रस्ताव नसल्याचा दावा करण्यात आला.
पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाने या मॅसेजची पडताळणी केली. एका युट्यूब चॅनलने हा खोडसाळपणा केल्याचे समोर आले. सरकारी ब्लॉग या नावाच्या या युट्यूब चॅनलने हा दावा केला होता. त्यानुसार, मोदी सरकार रेशन कार्डधारकांना दोन स्मार्टफोन आणि 10,200 रुपये देईल. हा व्हायरल मॅसेज खोटा असल्याचे समोर आले आहे.