Bird Flu: माणसांनाही बर्ड फ्लूचे संक्रमण होण्याची भीती

0

मुंबई,दि.14: Bird Flu: माणसांनाही बर्ड फ्लूचा नवा स्ट्रेन H5N1 ने संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगभरात एव्हीयन फ्लू (Avian Influenza) म्हणजेच बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका वाढताना दिसत आहे. धोकादायक म्हणजे बर्ड फ्लू माणसांनाही संक्रमित करु शकतो. त्यामुळे बर्ड फ्लू संसर्गाचा वाढता धोका पाहता संयुक्त राष्ट्राच्या तीन एजन्सींनी या विषाणूच्या प्रसाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लू मानवांना अधिक सहजपणे संक्रमित करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्यात एकीकडे आजार आणि विविध संसर्गाचं प्रमाण वाढत असताना आता बर्ड फ्लूनं टेन्शन वाढवलं.

नवा धोकादायक स्ट्रेन H5N1 | Bird Flu

एव्हीयन इन्फ्लूएंझा (Avian Influenza) म्हणजेच H1N1 फ्लूचा नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. बर्ड फ्लूचा H5N1 हा नवा प्रकार सापडला आहे. H5N1 स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जात आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे. संयुक्त राष्ट्र (UN) च्या अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ (WOAH) यासोबतच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने प्राणी वाचवण्यासाठी आणि लोकांचं संरक्षण करण्यासाठी सर्व देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केलं आहे.

माणसाला सहजपणे संक्रमित करु शकतो

जागतिक स्तरावर एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, बर्ड फ्लू मानवांना अधिक सहजपणे संक्रमित करू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. यूएन एजन्सींनी सर्व देशांना रोगाचं निरीक्षण अधिक बारकाईने करण्यास सांगितलं आहे. याशिवाय पोल्ट्री फार्ममध्ये स्वच्छता बाळगण्याचं आणि विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

माणसांना बर्ड फ्लूची लागण

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती देताना सांगितलं आहे की, बर्ड फ्लूची माणसांना लागण झाली आहे. सध्या अशी फक्त सहा प्रकरणे आहेत ज्यात लोक विषाणू-संक्रमित पक्ष्यांच्या जवळच्या संपर्कात होते आणि त्यांना सौम्य लक्षणं होती.

डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना स्पर्श करून, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यावर आणि संक्रमित प्राणी आणि पक्षी खाल्ल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमेयर यांनी सांगितलं होतं की, गेल्या वर्षी जगभरात चार जणांना एव्हियन फ्लूची (H5N1) लागण झाली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here