Bachchu Kadu On NCP: सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे: आमदार बच्चू कडू

0

अमरावती,दि.5: Bachchu Kadu On NCP: अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसोबत बंडखोरी करुन शिंदे-फडणवीस सरकारसोबत घरोबा केला आहे. मात्र, हा नवीन भिडू मित्रपक्षांना रुचल्याने दिसत नाही. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेताना विश्वासात घेतल नसल्याच खंत माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

आमदार बच्चू कडू काय म्हणाले? | Bachchu Kadu On NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सोबत घेताना त्यांचं मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. यावेळी विचारात व विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं आहे, असा दावा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला. तर राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्याने आता एकनाथ शिंदे सोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे. कारण माविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हती. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता. मात्र, त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी का? असे विचारले असता बच्चू कडू म्हणाले, की प्रश्न निवृत्तीचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे. हिजी विचारांची विभागणी झाली याचं दुःख शरद पवार यांना असेलच. त्या वेदना लहान नाही. आम्ही त्यांचं सांत्वन करतो. सर्वात आधी उठाव उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यानंतर आता अजित पवार यांनी केला. या सर्व उठावाचे भीष्म पितामहा शरद पवार आहेत. हे बंड शरद पवार यांच्यासाठी नवीन नाही. मात्र अजित पवार यांनी घेतलेलं पाऊल हे अभिनंदनीय असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here