सोलापूर,दि.१९: Subhash Gulve: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय हे धर्मराज काडादी व त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे (Subhash Gulve) यांनी दिली. रविवारी (दि.१८) गुळवे यांनी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याच्या पार्श्वभूमीवर काडादी यांच्या गंगा निवासस्थानी जाऊन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी गुळवे बोलत होते.
शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय… | Subhash Gulve
याप्रसंगी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज उर्फ पुष्कराज काडादी हे देखील उपस्थित होते. यावेळी गुळवे यांनी धर्मराज काडादी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून पवार कुटुंबीयासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुध्दा काडादी परिवाराच्या पाठीशी असल्याचे सांगितले.तसेच सत्ताधाऱ्यांनी व्यक्तीद्वेषापोटी सूडबुध्दीतून केलेल्या चिमणी पाडकामाचाही त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. (Subhash Gulve On Dharmraj Kadadi)
सभासद शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचा विचार करून कारखाना बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी काडादी यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, नजीब शेख, सरफराज शेख, इरफान शेख, मुसा अत्तार, महेश कुलकर्णी, सचिन खंडागळे, सौरभ पवार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.