Devendra Fadnavis On Politics: आगामी निवडणुका आणि मंत्रिमंडळ विस्तारावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0

मुंबई,दि.५: Devendra Fadnavis On Politics: आगामी निवडणुका आणि मंत्रिमंडळ विस्तारावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे लढवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. तर, मंत्रिमंडळ विस्तावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी माहिती दिली. पण, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलणं टाळलं. आता, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय. तसेच, दिल्लीवारीवरुन विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तरही दिलंय.  

नाना पटोले ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, त्या पक्षात माझ्या माहितीप्रमाणे प्रात: विधीलाही जायचं झालं तरी दिल्लीहून हायकमांडची परवानगी लागते. आमचा तर राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही दिल्लीला गेलो तर त्यात काय वाईट आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीक यांनी काँग्रेस आणि नाना पटोलेंवर पलटवार केला. तसेच, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचारलं ते एवढे महत्त्वाचे नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर बोलणं टाळलं.

मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे, पण केव्हा होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, तेच तुम्हाला सांगतील. आम्ही सगळ्या निवडणुका एकत्रित लढणार आहोत, त्याची रणनिती आखायची आणि जिल्हा व तालुका पातळीवर समन्वय घडवायचा, याचीही चर्चा आमची दिल्लीतील बैठकीत झाली. त्यामुळे, आगामी सर्वच निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

सत्तासंघर्षात शिवसेना हा मुळ पक्ष एकनाथ शिंदेंकडे निवडणूक आयोगाने सोपविला आहे. यामुळे राज्यातील आगामी निवडणुकांत शिवसेना -भाजपाची युती पुन्हा एकदा दिसणार आहे. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याचे शिंदे यांनी ट्विट केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here