SBI Regulation For 2 Thousand Note: SBI ने दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी जारी केली नियमावली

0

नवी दिल्ली,दि.21: SBI Regulation For 2 Thousand Note: SBI ने दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी नियमावली जारी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. 23 मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

SBI Regulation For 2 Thousand Note | नोटा बदलून घेण्यासाठी जारी केली नियमावली

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, 2000 रुपयांच्या नोटा एकावेळी 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेऊ शकतात.

तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता.

बँकेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, 2000 रुपयांच्या दहा नोटा बदलताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

2 हजारांची नोट चलनातून बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील, असे आरबीआयने म्हटले. आता 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत नागरिक 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here