मुंबई,दि.15: Devendra Fadnavis vs Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ईव्हीएमबाबत मोठा दावा केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला आहे. कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निकालानंतर देशातल्या विरोधी पक्षांचा आत्मविश्वासही बळावला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला नाही का? असं म्हणत काँग्रेस आणि मित्रपक्षांना डिवचण्याचा प्रयत्नही केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएममध्ये फक्त तीन ठिकाणीच घोटाळा होतो असा आरोप केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा ईव्हीएमबाबत मोठा दावा | Devendra Fadnavis vs Jitendra Awhad
‘त्यांना तीन प्रमुख राज्य स्वत:च्या ताब्यात ठेवायची आहेत. एक गुजरात, एक उत्तर प्रदेश आणि लोकसभा. ईव्हीएमचा घोटाळा फक्त या तिघांमध्ये होतो. बाकीच्या ठिकाणी ते म्हणतात राज्य गेलं तर गेलं. ईव्हीएममध्ये काही नाही, असा विश्वास ते लोकांना देतात. ते सगळं ईव्हीएममध्येच करतात, म्हणून इतकी राज्य जिंकून सुद्धा लोकसभेत काहीच होत नाही’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘याच्यापेक्षा मूर्खपणा काय असू शकतो. कालच्या निवडणुकीत भाजपने का नाही केलं? काही लोकांना मुर्खासारखी बोलायची सवय झाली आहे’, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे.