सोलापूर,दि.12: शासन आणि प्रशासन जनतेची कामे करत असतात. मात्र काही वेळा सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांची गरज समाजाला पडते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
वीरशैव व्हिजनला 10 हजारांचा ‘प्रेरणा निधी’ देताना ते बोलत होते. याप्रसंगी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, युवक आघाडी सचिव सचिन विभुते उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेत ‘जगण्याची सकारात्मक शैली’ या विषयावर व्याख्यान दिले होते. व्याख्यान देताना त्यांनी वीरशैव व्हिजनचे कार्य मी गेल्या तीन वर्षापासून पाहत आलेलो आहे. व्हिजनचे कार्य कौतुकास्पद आहे असा गौरव करीत व्हिजनच्या कार्यास आणखी गती मिळावी यासाठी 10 हजारांचा प्रेरणा निधी जाहीर केला होता. त्या रकमेचा धनादेश आज दिलीप स्वामी यांनी राजशेखर बुरकुले यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, विजय बिराजदार, शिवानंद सावळगी, राजेश नीला, सोमनाथ चौधरी उपस्थित होते.