रत्नागिरी,दि.६: Raj Thackeray On Sharad Pawar: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी पवारांच्या राजीनामा नाट्याचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.
ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा | Raj Thackeray On Sharad Pawar
राज ठाकरे म्हणाले, अजित पवार त्या दिवशी जसं वागत होते, ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलं. ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असं सगळं त्यांचं सुरू होतं. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होतं. हे सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार. अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवाह) असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भितीपोटी, या भितीपाई त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको.
राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांना वाटलं असेल हा (अजित पवार) आत्ता असं वागतोय पुढे कसा वागेल. अजित पवारांना त्यावेळी जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या. जे होतंय ते बरं होतंय असंच त्यांना वाटत होतं.
आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. तुम्ही त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, पक्षाला निवडून दिलं, त्यांनी कोकणाचा व्यापार केला. तुम्ही तिकडेच आहात, असं ते यावेळी म्हणाले. २००७ ला सुरू झालेला मुंबई गोवा रस्ता अजूनही काही नाही. मधले पॅचेस झालेत. मी मागेही फडणवीसांना फोन केला. मला त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितलं. त्यांना मी फोन केला. तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचं सांगितलं. ज्यांना आजवर निवडून दिलं त्यांनी आजवर यावर काही विचारलं का? या लोकांना मतदानाशी संबंधित विषय आहे फक्त. तोच समृद्धी महामार्ग पाहा. सुरू पण झाला आणि तेही चार वर्षात. नागपूर ते शिर्डी आणि पुढचं काम सुरू आहे, आता गाड्या फिरतायत. १६ वर्ष आमचा रस्ता पूर्ण होत नसल्याचं खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.