Sanjay Jaiswal: भाजपा खासदार संजय जैस्वाल यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान

0

मुंबई,दि.२९: भाजपा खासदार संजय जैस्वाल (Sanjay Jaiswal) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर वादग्रस्त विधान केलं आहे. विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असं ते म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संजय जैस्वाल काय म्हणाले? | Sanjay Jaiswal

जी व्यक्ती देशातील लोकशाही, न्यायालये आणि पत्रकारांना चुकीचं मानते, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही. खरं विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही. हेच दोन हजार वर्षांपूर्वी चाणाक्यनेही सांगितलं होतं. राहुल गांधींना बघितल्यानंतर त्यांच्या शब्दांची आठवण येते, अशी प्रतिक्रिया संजय जैस्वाल यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरूनही टीकास्र सोडलं. राहुल गांधींना मोदींना चोर म्हणून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. न्यायालयाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती. न्यायालयात ते माफी मागू शकले असते, मात्र, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी माफी मागितली नाही, असे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here