Fraud News: अभिषेक बच्चन, महेंद्र सिंग धोनी ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक

Fraud News: बनावट क्रेडिट कार्ड काढून खरेदी

0

मुंबई,दि.3: Fraud News: सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्ह्यांसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन प्रकाराचा अवलंब करतात. आता गुन्हेगांरी चक्क बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Credit Card Fraud)

पॅन कार्डचा डेटा चोरला | Fraud News

एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप ‘वन कार्ड’कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे GST क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती हॅकर्सना मिळाली होती. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे PAN डिटेल्स काढले आणि त्याद्वारे त्यांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड जारी करत फसवणूक केली.

क्रेडिट कार्ड कंपनीकडून पोलिसांत तक्रार | Credit Card Fraud

पुण्यातील फिनटेक स्टार्टअप कंपनीने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ‘वन कार्ड’ क्रेडिट कार्ड जारी केलं जातं. तसेच ऑनलाईन सेवाही पुरवल्या जातात. या क्रेडिट कार्डचा वापर ग्राहक ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी करु शकतात.

सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या ओळखपत्रांचा गैरवापर

कंपनीने आरोप केला आहे की, “या फसवणूक करणाऱ्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या नावावर जारी केलेले क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक ही माहिती अपलोड करुन ॲपद्वारे कंपनीशी संपर्क साधला होता.”

या बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या नावाने फसवणूक

दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्त रोहित मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सायबर गुन्हेगारांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाशमी आणि महेंद्र सिंग धोनी यांचं नाव आणि पॅन कार्ड वापरु क्रेडिट कार्ड बनवली.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here