ऑनलाईन रोजगार मेळावा: ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

0

सोलापूर,दि.14: ऑनलाईन रोजगार मेळावा | सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. (Online Job Fair) नोकरी इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावरून नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदासाठी ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहा. आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

ऑनलाईन रोजगार मेळावा

सुशिक्षित उमेदवारांसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्या करिता http://www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित केलेले असून उमेदवारांसाठी सर्व सुविधा ऑनलाईन सुरु केलेल्या आहेत. नाव नोंदणी झालेनंतर आपण आपला युझर आयडी व पासवर्डचा वापरुन आपण स्वतः आपली सर्व माहिती अद्ययावत करू शकता असे त्यांनी सांगितले.

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान सुरु

आर्थिक दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान सुरु असून, या अभियानातंर्गत असलेल्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहा. आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

या योजनेत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना असून, या योजनेतंर्गत कोणत्याही व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील रुपये 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्षाकरीता 12 टक्केच्या मर्यादित अथवा 4 लाख् 50 हजार रुपयांच्या मर्यादेत व्याज परतावा करण्यात येईल.

प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान | Online Job Fair

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी शासनाने प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या अतंर्गत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेतून आपणास हवे असणारे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते.

सदर सुविधांचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या 0217- 2950950 या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा असे, आवाहनही सहा. आयुक्त जाधव यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here