मुंबई,दि.3: Horse Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. दररोज काही ना काही तरी व्हायरल होत असते. अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात. प्रत्येक प्रकारचा व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर फिरताना दिसेल. नेटकरीही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पहायला पसंत करतात. अशातच घोडा (Horse) डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या लक्ष वेधत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले असून व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. (Horse Viral Video)
घोड्याने केला जबरदस्त डान्स | Horse Viral Video
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे, घोडा ढोलाच्या आवाजावर जबरदस्त डान्स करत आहे. वर खाली पाय घेत घोडा ढोलाच्या तालावर नाचू लागताच आजूनबाजूला असलेले लोक त्याला आश्चर्यचकित झाले आहेत. एक व्यक्ती घोड्याला हाताळतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून घोड्याला याचं ट्रेनिंग दिल्याचं समजत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल | Horse Video
घोड्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. हा व्हिडीओ khillar_premi_karmalkar या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसत आहे. अनेक मजेशीर आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिसत आहे.