सोलापूर,दि.19: Shankar Mhetre News: रेवणसिद्ध मल्लिनाथ सोन्नद यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अक्ककोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर सातलिंगआप्पा म्हेत्रे (Shankar Mhetre) आणि गुरुशांत कोलाटी दोघे रा. दुधनी, ता. अक्कलकोट यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल (दि.18) अतिरिक्त सत्र न्यायाधीश भोसले यांच्या न्यायालयात आरोपीतर्फे व सरकारपक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. मूळ फिर्यादीतर्फे युक्तिवादासाठी आज (दि.19) तारीख देण्यात आलेली आहे.
काय आहे प्रकरण? | Shankar Mhetre News
यात हकीकत अशी की शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे रा. दुधनी ता. अक्कलकोट यांचे शांभवी इंडस्ट्रीज अंतर्गत ऐश्वर्या अक्वा व अक्यूफीअर ड्रॉप वॉटर क्युरीफाय कंपनी मधे फिर्यादी नोव्हेंबर 2015 पासून मार्केटिंग मॅनेजर म्हणून कामास लागला सदर कंपनीत मॅनेजर म्हणून रेवनसिद्ध मल्लिनाथ सोन्नद कामास होता.
हिशोब देण्यास टाळाटाळ | Solapur Crime
31 जुलै 2022 अखेर शंकर म्हेत्रे यांनी रेवणसिद्ध सोन्नद यास हिशोब मागितला. त्यावेळी त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर सोन्नद याने व्हॉट्सॲपद्वारे माझी मनस्थिती चांगली नाही म्हणून हिशोब पूर्ण देवू शकत नाही असा मेसेज पाठविला. तदनंतर शंकर म्हेत्रे, गुरुशांत कोलाटी व इतर यांनी हिशोब करुन सोन्नदकडे 13 लाख व त्यावर व्याज व दंडासाहित 27 लाख निघतात व एकूण फिर्यादी व सोन्नद यांचेकडे चाळीस लाख रुपये निघतात, असे सांगून ते देण्याकरिता दमदाटी करून कपनीचे लेटर पॅडवर जबरदस्तीने लिहून घेतले व त्यावेळी आठ दिवसात पैसे द्या नाही तर तुम्हाला खलास करतो व तुमच्या विरुध्द पोलिसात तक्रार दाखल करतो अशी धमकी देऊन जबरदस्तीने सह्या घेतल्या.
त्यांचे त्रासामुळे रेवणसिद्ध सोन्नद याने कंपनी मधे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यास शंकर म्हेत्रे व गुरुशांत कोलाटी यांनी प्रवृत्त केले अशा आशयाची फिर्याद काशिनाथ येरगल यांनी अक्ककोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. सदर गुन्ह्यामध्ये शंकर म्हेत्रे व गुरूषांत कोलाठी यांना अटक होईल ह्या भीतीपोटी त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
सदर जामीन अर्जावर आरोपींचे वकिलांचा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झाला तर मुळफिर्यादी तफे आज युक्तिवाद होणार असून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू व अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यात आरोपी असल्याने संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे या सूनवणीकडे लक्ष लागलेले आहे. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. संतोष न्हावकर ॲड. राहुल रूपनर, सरकारतर्फे रामपुरे तर आरोपीतर्फे ॲड. श्रीकांत गडदे हे काम पाहत आहेत.