Operation Lotus: भाजपच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात होणार सत्तांतर?

Operation Lotus: हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी हालचाली सुरू

0

शिमला,दि.1: Operation Lotus | भाजपाच्या (BJP) नेत्याने दावा केल्यानुसार महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात होणार सत्तांतर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले. महाराष्ट्रात सत्तांतर झाले. भाजपाच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी भाजपाने ऑपरेशन लोटस (Operation Lotus) सुरू केल्याच्या चर्चा सुरू होत्या, अखेर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये (Operation Lotus In Himachal Pradesh) सत्तांतर घडवून आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत्त आहे.

हिमाचल प्रदेशात ऑपरेशन लोटस सुरू? | Operation Lotus

महाराष्ट्रात संत्तातर घडवल्यानंतर आणखी एका काँग्रेसशासित राज्यात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन 20 दिवस झाले आहेत. सीएम सुखविंदर सिंग आणि डेप्युटी सीएम मुकेश अग्निहोत्री यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला. परंतु, अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्याचवेळी मंडी जिल्ह्यातील बाल्ह विधानसभेतील भाजप आमदार इंदर सिंग गांधी यांनी दावा केला आहे की जयराम ठाकूर राज्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी पलटवार केला आहे. यापूर्वी भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या विक्रम सिंह यांनीही ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भात पोस्ट टाकली होती. मात्र, नंतर त्यांनी त्यांची पोस्ट एडीट केली होती.

जाहिरात

ऑपरेशन लोटस सुरू झाले असून… | Operation Lotus In Himachal Pradesh

प्रत्यक्षात भाजप आमदार इंद्र सिंग गांधी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ऑपरेशन लोटस सुरू झाले असून काँग्रेसलाही याची जाणीव आहे. मला जेवढे माहीत आहे तेवढी देत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच काँग्रेसचे 18 आमदार बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत बसलेल्या नेत्यांना याची अधिक माहिती आहे. भाजपने काँग्रेसचे आमदार पळवले आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले, कदाचित.

विक्रम सिंह यांनीही पोस्ट केली होती

नुकतीच भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले विक्रम सिंह यांनीही फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘काँग्रेस सरकार आमच्या दबावाखाली नाही तर स्वतःच्या वजनाने पडेल…@ऑपरेशन लॉट्स. मात्र, नंतर त्यांनी आपली पोस्ट एडीट करून ऑपरेशन लोटस काढले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here