पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन, 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

अहमदाबाद,दि.30: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Hiraben Modi Passes Away) अलीकडेच आजारी पडल्याने हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हीराबेन यांचे निधन झाले. 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. 

हेही वाचा पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या, शीर आणि स्तन कापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली माहिती | Heeraben Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

Heeraben Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हीराबेन मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते रुग्णालयात

हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांचे उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

जाहिरात

पंतप्रधान मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ते हिराबेन यांचे आशीर्वाद घेताना दिसले. मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here