मुंबई,दि.20: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक कऱण्यात आली आहे. आर्यन खान गेल्या 13 दिवसांपासून कारागृहात आहे. आर्यन खान याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन फेटाळला आहे.
आर्यन खानला 2 ऑक्टोबरला एनसीबीकडून अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे. कोर्टानं आर्यनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आज आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी एनडीपीएस कोर्टात आज पार पडली. मात्र, आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आता आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
आर्यन खानच्या जामीन याचिवेर सुनावणीदरम्यान एनसीबीने कोर्टाला सांगितलं की, त्यांच्याजवळ असे पुरावे आहेत ज्यावरुन असं कळतं की, आर्यन बऱ्याच वर्षांपासून प्रतिबंधित ड्रग्सचं सेवन करीत होता. इतकच नाही तर त्याने दुसऱ्या देशांमध्ये जाऊनही नशा केला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहे.