Purushottam Barde | शहर उत्तर विधानसभा मतदार संघात पुढील आमदार शिवसेनेचा: पुरुषोत्तम बरडे

शहर उत्तरमध्ये भाजपाचे आमदार केवळ शिवसेनेच्या पाठिंबा मुळेच निवडुन आले: पुरूषोत्तम बरडे

0

सोलापूर,दि.12: शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी सन 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच आमदार होणार असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना उत्तर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक

शिवसेना पक्षबांधणी अंतर्गत सुरू असलेल्या अभियाना अंतर्गत शहर उत्तर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक गुलमोहर अपार्टमेंट मधील सभागृहात घेण्यात आली. सदर बैठक जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर संघटक अतुल भंवर, समन्वयक महेश धाराशिवकर, लहु गायकवाड, महिला आघाडीच्या स्वातीताई रुपनर, वैशालीताई सातपुते, मिनाक्षीताई गवळी, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी शिवरायांचे प्रतिमेचे पुजन महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर तुषार आवताडे यांनी प्रस्तावना केली.

काय म्हणाले पुरूषोत्तम बरडे?

अध्यक्षीय भाषणात जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे म्हणाले की, गेले चारवेळा शहर उत्तरमध्ये भाजपाचे आमदार केवळ शिवसेनेच्या पाठिंबा मुळेच निवडुन आले. आता यावेळी पक्षाचे संघटनात्मक बांधणी व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा चमत्कार लक्षात घेता. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचाच आमदार निवडून येणार असा विश्वास व्यक्त करून बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना घरोघरी शिवसेना सदस्य नोंदणी करा. असे आवाहन केले.

पुरूषोत्तम बरडे

काय म्हणाले विष्णु कारमपुरी?

शहरप्रमुख विष्णु कारमपुरी म्हणाले की, संघटनात्मक बांधणी ही पुढील महापालिका निवडणुकीची नांदी आहे असे म्हणत पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर संघटक अतुल भंवर, महिला आघाडी उपशहरप्रमुख स्वातीताई रूपनर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन महेश धाराशिवकर यांनी केले.

सदर बैठकीत उपशहरप्रमुख दिपक दळवे, मलिक हब्बु, संदीप बेळमकर, संजय सांळुखे, विजय पुकाळे, लहु गायकवाड, संताजी भोळे, संजय गवळी, सोमनाथ शिंदे, शेखर इराबत्ती, यलप्पा मिठ्ठा, सुशिल कन्नुरे, दिपक गवळी, बाळासाहेब गायकवाड, शशिकांत बिराजदार, रतन खैरमोडे, नागेश मंजेली, दिपक दुधाळ, ब्रम्हदेव गायकवाड, आशुतोष बरडे, आबा सावंत, बबलु खरात, राधिका मिठ्ठा, रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, संभाजी कोडगे, गणेश म्हंता यांच्यासह उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here