Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीविताला धोका, मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

Breaking News: मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे हा मेसेज पाठवण्यात आला आहे

0

मुंबई,दि.22: Breaking News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीविताला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज (Audio Message) एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे हा मेसेज पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावेळी मात्र एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर आल्या.

यामध्ये एका अज्ञात इसमानं दावा केला होता की, “दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाची सूत्रं एका इसमाजवळ जाऊन थांबली. या व्यक्तिसंदर्भात चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासाअंती असं आढळून आलं की, मेसेज करणाऱ्या व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे.” या व्यक्तिवर पोलिसांनी कोणती कारवाई केली की, नाही? यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही व्यक्त केरळमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here