अभिनेत्री सारा अली खानचे याकरिता होत आहे कौतुक

0

दि.17: सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ती सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा अली खान चित्रपट आणि जाहिरातच्या शूटिंग दरम्यान देखील चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी वेळ काढते. सारा अली खान सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांशी जोडलेली राहते. आता अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे तिचे खूप कौतुक होत आहे. सारा अली खान फोटोत आणि व्हिडीओमध्ये गरिबांना बिस्किटे वाटताना दिसत आहे.

सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंह देखील यावेळी उपस्थित होते. वास्तविक, सारा तिच्या कुटुंबासह वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. या दरम्यान तिला पाहणाऱ्या लोकांची गर्दी जमली. या दरम्यान, काही गरीब लोकांनी तिच्याकडून मदतीची अपेक्षा केली आणि अभिनेत्रीनेही कोणालाही निराश केले नाही. ती पटकन गाडीच्या दिशेने गेली आणि तिथून बिस्किटे घेऊन लोकांमध्ये वाटली. तसेच गरजूंना काही पैसे दिले.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सोशल मीडियावर सारा अली खानच्या दयाळूपणाचे खूप कौतुक केले जात आहे. चाहत्यांसोबत सेलिब्रेटीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सारा अली खानने 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

यानंतर तिने ‘लव आज कल’ आणि सिंबा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी’ मध्ये दिसणार आहे. सारा वरुण धवनच्या कुली नंबर 1 मध्ये दिसली होती आणि चाहते तिच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here