लखनऊ,दि.5: हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. लखनऊमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लखनऊच्या हॉटेलमध्ये मोठा अग्नितांडव पाहायला मिळाला. हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण होतं. लोक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते.
उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज इथल्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आतमध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरू आहे.
ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. लोक जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उतरत आहेत. अग्निशमन दलाचे जवान या लोकांना रेस्क्यू करत आहेत. हॉटेलमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.