‘हिंदू-शिखांना आपसात लढवण्याचा प्रयत्न’ : खासदार वरुण गांधी

0

दि.१०: उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे लोकसभेतील भाजपचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी लखीमपूर खिरी प्रकरणावरून आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारवरून हिंदू आणि शिखांना आपसात लढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वरुण गांधी म्हणाले.

वरुण गांधी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारावरून हिंदू आणि शिखांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फक्त अनैतिक आणि चुकीचेच नाही, तर दोष देणे आणि त्या जखमा पुन्हा चिघळवणं धोकादायक आहे. एका छोट्या राजकीय फायद्यासाठी देशाची एकता धाब्यावर ठेवू शकत नाही, असं म्हणत वरुण गांधींनी भाजप नेतृत्वार निशाणा साधला आहे.

वरुण गांधी यांनी यापूर्वी गुरुवारी ट्विटरवर वरून लखीमपूर खिरी घटनेची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. यात भाजप नेत्याच्या ताफ्यातील एसयूव्ही आंदोलक शेतकऱ्यांना चिरडताना दिसते आहे. ‘व्हिडिओ अतिशय स्पष्ट आहे. आंदोलकांची हत्या करून त्यांना शांत केले जाऊ शकत नाही. निरपराध शेतकऱ्यांच्या हत्यांप्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात अहंकार आणि क्रौर्याचा संदेश जाण्यापूर्वी त्यांना न्याय दिला पाहिजे, असं वरुण गांधी म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here