मलाही आता भूकंप करावा लागेल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मालेगाव,दि.30: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्र्वासघातकी म्हणून टीका केली होती. उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) हे एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांवर वारंवार टीका करत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे या आरोपांना उत्तर देत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे रोज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर टीका करत आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटातूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही आमचे आई-बाप का काढता?, सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, असा सवाल उपस्थित करत मलाही आता भूकंप करावा लागेल, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करणार असल्याचं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावं लागेल, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here