सोलापूर जिल्ह्यातील मंदिर व प्रार्थनास्थळा बाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढला आदेश

0

सोलापूर,दि.६:राज्य सरकारने राज्यतील सर्व धार्मिक स्थळे गुरुवार दि.७ पासून खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांनी संदर्भ क्र. ४ अन्वये सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी मंगळवार पाच ऑक्टोबर रोजी नवे आदेश पारित केले, यामध्ये येत्या सात ऑक्‍टोबर पासून ग्रामीण भागातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

मात्र हे आदेश देताना त्यांनी नियम व अटी घालून दिले आहेत सोशल डिस्टन्स पाळून मास्कचा वापर करून मंदिरात प्रवेश करण्याच्या सूचना आहेत, मंदिरे उघडण्याची वेळ आणि आत मध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत, त्याचबरोबर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढू नये याची काळजी घेण्यासाठी विविध नियम व अटी घालून दिले आहेत.

माळशिरस, करमाळा, सांगोला, पंढरपूर तसेच माढ्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील व्यापारी दुकाने गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून रात्री दहापर्यंत सुरू राहतील. यासोबत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थना स्थळेही सुरू राहतील. रोज किती भक्त दर्शन घेतील, याबाबत मंदिर समितीने निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिले आहेत.

वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, माळशिरस, करमाळा, सांगोला तसेच माढा तालुक्यात दुपार चारपर्यंत जमावबंदी तसेच सायंकाळी पाच नंतर संचारबंदी होती. ही संचारबंदी गुरुवारपासून उठवण्यात आली असून, आता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

दुकानांबरोबरच हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू राहतील. एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांची सवलत दिली आहे. पन्नास टक्के क्षमतेने सलून, क्रीडांगणे व व्यायामशाळांना सूट दिली आहे. मंगल कार्यालये व सभागृहे ५० टक्केच्या क्षमतेने सुरू राहतील. बंदिस्त सभागृहातील लग्न समारंभाला १०० जणांना तसेच खुल्या लॉनमधील विवाह सोहळ्यास दोनशे जणांना उपस्थित राहता येईल. नवीन आदेशामुळे ग्रामीण भागातील व्यापारी व दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिनेमागृहे आणि थिएटर्संना अद्याप सुट देण्यात आलेली नाही. मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू राहतील. अठरा वर्षातील मुलांना मॉलमध्ये जाताना वयाचा दाखला किंवा आधारकार्ड सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आला आहे.

ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे, अशा परराज्यातील नागरिकांना ७२ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील, असे आदेशात म्हटले आहे.

मंदिरासाठी नियमावली

सैनिटायझर, मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक

प्रतिबंधित क्षेत्रातील मंदिरे बंद राहतील
मंदिरातील पुतळे, मूर्ती तसेच पवित्र ग्रंथास स्पर्श करू नका

मंदिर परिसरात मेळावे, संमेलनांना बंदी

प्रसाद तसेच तीर्थ वाटपाला बंदी
तीर्थही शिंपडता येणार नाही

भक्तीगीते वगळता समूहगीते गाण्यास बंदी

आजारी व्यक्तींसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था असावी

पादत्राणे स्वत:च्या वाहनात ठेवा
एकाच चटईवर एकाने प्रार्थना करावी


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here