ड्रायव्हिंग सीटवर कारचा दरवाजा न उघडताच आतमध्ये बसली तरुणी, Video व्हायरल

0

दि.5: सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही प्रेरणादायक असतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेक विचित्र शॉर्टकटचे व्हिडिओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो अतिशय वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी एक महिला ज्या प्रकारचा शॉर्टकट घेते, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

ही महिला गाडीच्या आत जाण्यासाठी अतिशय अजब पद्धत अवलंबते. सोशल मीडिया यूजर्स हे पाहून थक्क झाले आहेत, कारण यादरम्यान तिचा फिटनेस दिसत आहे. ही महिला कारच्या आत जाण्यासाठी गाडीचा दरवाजाही उघडत नाही, तर कारच्या खिडकीतूनच ती आत जाते. अतिशय सुंदर पद्धतीने ती हे काम करते. या अप्रतिम व्हिडिओने (Viral Video) नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kavy (@imkavy)

या व्हिडिओने लोकांसमोर एक नवीन गोल सेट केला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही विचार कराल की कोणी इतकं फिट कसं असू शकतं. यासोबतच महिलेला असं करण्याची काय गरज होती, असा सवालही काही लोक विचारत आहेत. काहींनी म्हटलं की ती सरळ मार्गानेही गाडीच्या आत जाऊ शकली असती. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्यासाठीच तिने हे केलं आहे. मात्र, फिटनेस प्रेमींसाठी हा व्हिडिओ चॅलेंजपेक्षा कमी नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कार रस्त्यावर उभी आहे. या गाडीचा दरवाजा बंद आहे पण खिडकी उघडी आहे. तेवढ्यात एक महिला तिथे येते आणि लगेच फ्लिप मारत खिडकीच्या मदतीने गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसते. इंस्टाग्रामवर imkavy नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे आणि लोकांच्या पसंतीसही उतरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here