मुंबई, दि.17: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर रसायनीनजिक एसटी आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहे. संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे.
आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.