7th Pay Commission Updates: 32 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात सरकार 2 लाख जमा करणार

0

नवी दिल्ली,दि.3: 7th Pay Commission: केंद्र सरकारच्या 31 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन वर्षाची बंपर भेट (New Year Gift) मिळणार आहे. केंद्र सरकार (Central Government) या महिन्यात महागाई भत्त्याची (DA) थकबाकी देऊ शकते. गेल्या 18 महिन्यांची डीएची थकबाकी एकाच वेळी देण्याची सरकारची तयारी आहे. असे झाल्यास येत्या काही दिवसांत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Govt Employees) एकावेळी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.

डीए 18 महिन्यांपासून प्रलंबित आहे

सरकारी अहवालानुसार 1 मार्च 2019 पर्यंत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या 31.43 लाख होती. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 18 महिन्यांपासून डीएचे पेमेंट प्रलंबित आहे. ताज्या बातमीनुसार, केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा प्रलंबित DA या महिन्यात देणार आहे. 18 महिन्यांचा प्रलंबित डीए (Pending DA) भरल्यास अनेक कर्मचाऱ्यांना एकावेळी दोन लाखांहून अधिक रक्कम मिळणार आहे.

DA, DR, वाढू शकते

वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Central Cabinet) पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत डीए आणि डीआर वाढवण्याचाही निर्णय होऊ शकतो. याशिवाय भरपाई (कंपनशेसन) वाढवण्याचीही तयारी सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने डीए आणि डीआर 17 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​होते.

निवृत्तिवेतनधारक माजी कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल

उल्लेखनीय आहे की महागाई कमी करण्यासाठी, DA-DR वाढीचा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक माजी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा दिला जातो. येत्या बैठकीत 18 महिन्यांची थकबाकी भरण्याचा निर्णय घेतल्यास लेव्हल-1 कर्मचाऱ्यांना 11,880 ते 37,554 रुपये मिळतील. त्याचप्रमाणे लेव्हल-13 कर्मचाऱ्यांना एका वेळी 1,44,200 ते 2,18,200 रुपये मिळू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here