Chittoor Accident: चित्तूर येथे बसच्या भीषण अपघात ७ जणांचा मृत्यू, तर ४५ जण जखमी

0

दि.२७:Chittoor Accident: बसच्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४५ जण जखमी झाले आहेत. आंध्रप्रदेशमधील चित्तूर (Chittoor Accident) येथे एका बसचा भीषण अपघात झाला. यात अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिरुपतीपासून २५ किलोमीटर अंतरावर बकरापेट येथे ही घटना घडली.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस उंच कड्यावरून खाली कोसळली, अशी माहिती तिरुपतीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे शनिवारी रात्री झालेल्या बस अपघातात सात जण ठार तर ४५ जखमी झाले. रिपोर्टनुसार, हा अपघात तिरुपतीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खडकावरून दरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एसपी तिरुपती यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस लग्न समारंभासाठी जात होती, असे सांगण्यात आले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here