5G Network: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण

0

नवी दिल्ली,दि.1: 5G Network: आज देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. देशात आजपासून 5जी नेटवर्कची घोषणा झाली आहे. एअरटेलने आजपासून आठ शहरांत 5जी सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तर रिलायन्सने दिवाळीपर्यंत देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनचा तर पत्ताच नाहीय. अशावेळी तुम्हाला 5जी कसे वापरता येणार? त्यासाठी सिमकार्ड बदलावे लागणार की मोबाईल आदीची माहिती घेणे महत्वाचे आहे. 

यासह भारताने टेलिकॉम (Telecom Industry) क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. भारतात सुरु असलेल्या डिजिटल इंडिया (Digital Inadi) चळवळीलाही या 5G इंटरनेट सेवेमुळे (5G Internet Benefits) फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण पार पडलं. यावेळी टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमटचा लिलाव पार पडला. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये 5G नेटवर्कसाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. आज अखेर देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे.

नवा मोबाईल घेतला असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे बँडस् कोणते आहेत ते. 10-11 हजारापासून ५जी फोन बाजारात आहेत. त्यामध्ये दोन बँडपासून बँड सुरु होतात. काही मोबाईलमध्ये पाच, सात, 11 आणि 13 असे बँड्स देण्यात आले आहेत. कमी बँडच्या स्मार्टफोनवर रिलायन्सची सेवा मिळू शकते, परंतू तिचा वेगही कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे 4जी पेक्षा थोडा जास्त असेल परंतू एअरटेलच्या हाय बँडपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यासाठी कमीतकमी 15 हजारांचा स्मार्टफोन घ्यावा लागणार आहे. 

आता प्रश्न उरतो तो सिमकार्डचा. एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन 5जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेल्या 4जी सिमवरच 5जी नेटवर्क वापरता येणार आहे. या दोन्ही नेटवर्कच्या सिममधील टेक्निकमध्ये फारसा फरक नाहीय. सिमच्या माध्यमातून तुम्हाला युनिक आयडी दिला जातो. त्यानुसार तुमचे नेटवर्क आणि प्लान ॲक्टिव्ह असतो. यामुळे तुम्हाला नवीन सिम घेण्याची गरज पडणार नाही. 

जसे 4जी सोबत झाले तसेच 5जी सोबत होणार आहे. तुम्हाला 5जी वापरण्यासाठी 5जी फोनच वापरावा लागणार आहे. जर कंपन्यांनी खास 5जी सिम दिले तर सिमकार्डच्या साईजमध्ये देखील कोणताही बदल असणार नाही. परंतू, 5G SIM असले काय आणि 4G SIM असले काय, तुम्ही तेव्हाच 5जी नेटवर्क वापरू शकता जेव्हा तुम्ही 5जी चे रिचार्ज मारणार. म्हणजेच 5जी च्या प्लॅननुसार तुम्हाला डेटा वापरता येणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here