सोलापूर,दि.१३: राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील सेवेतून कमी करण्यात आलेल्या राज्यातील ५९७ आरोग्यसेविकांची (सोलापूर जिल्ह्यातील ३३ आरोग्यसेविकांची) तात्पुरती सेवा कायम राहावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे प्रयत्न करून आरोग्यसेविकांच्या सेवा कायम ठेवण्यासाठी विनामूल्य उत्तम कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांचे आभार मानले आहेत.
मनिष काळजे यांच्यामुळे मिळाला न्याय | Manish Kalje
काळजे यांचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात हस्तक्षेप का? असा प्रश्न काहीजणांनी उपस्थित केला होता. मात्र, आता दुसरीकडे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने आरोग्यसेविकांच्या सेवा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करून काळजे यांनी न्याय मिळवून दिला आहे.
कार्तिक वारीच्या कार्यक्रमात व्यस्त असतानासुध्दा आपण या आरोग्यसेविकांना तात्पुरत्या सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले हे कौतुकास्पद आहे. आता या आरोग्यसेविकांचे इतरत्र समायोजन न होता. त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी विनंतीही जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने काळजे यांच्याकडे केली आहे.
आरोग्य विभागात चांगले काम सुरूच ठेवणार
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरोग्य विभागात चांगले काम सुरूच ठेवणार आहे. राज्य आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्या निश्चित पूर्ण करू, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले.