Breaking: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 35 आमदार?

0

दि.21: Breaking News: विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे तब्बल 35 आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत दिले आहे.

काल संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदें सर्व आमदारांनी प्लानिंग करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतून सूरतला जाणाऱ्या फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं. त्यासोबतच, एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं. सर्वात आधी 11 विधेयक रात्री वाजेपर्यंत सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचले. त्यापाठोपाठ दीड वाजता एकनाथ शिंदेंसह आणखी काही आमदार हॉटेलमध्ये पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंसोबत 25 ते 30 शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. स्थानिक भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मदत केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here