पळून जाण्याच्या प्रयत्नात इनोव्हा गाडीने दिलेल्या धडकेत ३ जणांचा मृत्यू

0

मुंबई,दि.१०: बांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली होती.

एका इनोव्हा गाडी चालकाने आधी मर्सिडीजला धक्का दिला आणि त्यानंतर टोल नाक्यावरून घाईत जाण्यासाठी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना मागून वेगाने जोरदार धडक दिली. यात ९ नागरिक जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक जखमी असून आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

डीसीपी कृष्णकांत उपाध्ये या अपघाताची माहिती देताना म्हणाले, “आज रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळीहून वांद्र्याकडे जात होती. सी लिंकवर टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर ही इनोव्हा गाडी मर्सिडीज गाडीला घासून गेली. त्यानंतर इनोव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि टोल प्लाझावरून लवकर जाण्यासाठी पुढे येऊन दोन तीन गाड्यांना धडक दिली.”

“या अपघातात ९ लोक जखमी झाले होते. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर होती. त्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित सहा जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर चार जणांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका रुग्णाला लिलावती रुग्णालयात हलवण्यात आलं आहे,” अशी माहिती डीसीपी उपाध्ये यांनी दिली.

मला मारण्याचा प्रयत्न

वरळी सी लिंकवरील अपघातावेळी घटनास्थळी भाजपा नेता जितेंद्र चौधरी होते. त्यांनी या कार चालकाने सी लिंकवर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा केला आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने आपल्या कारला टक्कर मारली होती. मी ज्या बाजुला बसलेलो त्याच बाजुला कारने टक्कर मारली. परंतू, आपली कार समुद्रात पडण्यापासून वाचली, असा दावा त्यांनी केला आहे. एनबीटीने या दाव्याचे वृत्त दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here