भाजपाचे 25 नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात?

0

जळगाव,दि.1: भारतीय जनता पार्टीचे 25 नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. जळगाव लोकसभेत आता ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे भाजपचे जवळपास 25 नगरसेवक हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. जळगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी भाजपचे 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारा बद्दल या सर्वांमध्ये नाराजी आहे. हे नगरसेवकर शरीराने भाजप बरोबर आहेत. पण शिवसेनेच्या बैठकांना हजर राहून ते शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचा दावाही महाजन यांनी केला आहे.  हे सर्व नगरसेवक भाजपमधील हुकुमशाहीला कंटाळले आहेत. त्यामुळे ते लवकरच शिवसेना ठाकरे गटाचे काम लोकसभा निवडणुकीत करतील असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जळगाव भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. 

जळगाव लोकसभेतून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज झाला होता. त्यानंतर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. शिवाय आपले समर्थक करण पवार यांना उमेदवारीही मिळवून दिली आहे. करण पवार यांना निवडून आणण्यासाठी उन्मेष पाटील यांनी कंबर कसली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here