दि.15: कॅरी मिनाटीचे युट्यूबवर दोन चॅनेल्स आहेत. एकाचे नाव कॅरीमिनाटी आहे तर दुसऱ्याचे नाव कॅरी इज लाइव्ह असे आहे. कॅरी मिनाटी चॅनेलवर 19.4 मिलियन सबस्क्रायबर आहेत. तर कॅरी इज लाइव्हवर 15 मिलियन सबस्क्रायबर आहेत. कॅरी मिनाटीचे इंस्टाग्रामवर 6.7 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ट्विटरवर ही संख्या 15 लाख आहे. अशापद्धतीने कॅरी मिनाटीच्या चाहत्यांची एकूण संख्या 32.75 मिलियन म्हणजे 3 कोटी 27 लाखाहून जास्त आहे.
कॅरी मिनाटी नावाच्या मुलाने वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी युट्यूबच्या जीवनात प्रवेश केला, आणि आज त्याचे तब्बल तीन कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. देशातील प्रसिद्ध आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या युट्यूबर्सपैकी एक असलेल्या कॅरी मिनाटी या तरुणाच्या वार्षिक उत्पन्नाबाबत नुकताच मोठा खुलासा झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे. युट्यूबर कॅरी मिनाटीचे खरे नाव अजय नागर असून तो त्याच्या कॉमिक अंदाजासह रोस्ट सेंट्रिक व्हिडिओकरिता ओळखला जातो.
कॅरी मिनाटीने अवघ्या 10 वर्षांचा असतानाच युट्यूबच्या जगात पाऊल ठेवले होते. आणि आज 22 व्या वर्षी युट्यूबवर त्याचे तीन कोटी 14 लाख सबस्क्रायबर्स आहेत. कॅरी मिनाटीबाबत आणखी एक मजेदार सत्य हे आहे की, देशात जेव्हा टिकटॉकवरुन वाद सुरू होते, त्यावेळी त्याने बनवलेला ‘युट्यूब विरुद्ध टिकटॉक – द एंड’ हा व्हिडिओला तब्बल सात कोटी व्यूज मिळाले होते.
कॅरी मिनाटीच्या वार्षिक उत्पन्नाविषयी बोलायचे झाले तर ते अनेक कंपन्यांमध्ये असलेल्या सीईओपेक्षाही अधिक आहे. होय, माध्यमांतील वृत्तानुसार फरीदाबाद येथील रहिवासी असलेल्या अजय नागरचे एक वर्षाचे आर्थिक उत्पन्न साधारण तीन कोटी रुपये आहे. असे सांगितले जाते की कॅरी मिनाटी दर महिन्याला 25 लाख रुपयांची कमाई करतो. देशातील या सर्वोच्च स्थानी असलेल्या युट्यूबरची एकूण संपत्तीबाबत बोलायचे झाले तर कॅरी मिनाटीजवळ 32 कोटींची संपत्ती आहे. कॅरी मिनाटी बॉलिवूड स्टार सनी देओल व ऋतिक रोषण यांची मिमिक्री देखील खूपच चांगल्या प्रकारे करतो.