Zameer Khan | कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांचे पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल 

0
Zameer Khan | जमीर खान

सोलापूर,दि.३: Zameer Khan | कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांनी पाकिस्तानबाबत (Pakistan) मोठे वक्तव्य केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक मंत्री जमीर अहमद खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते शेजारी देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी आत्मघातकी बॉम्बसह पाकिस्तानला पाठवण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषदेत खान म्हणाले की, पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परवानगी दिली तर ते युद्धात सामील होण्यास तयार आहेत. (Zameer Khan On Pahalgam Terrorist Attack)

Zameer Khan

Zameer Khan | कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांचे पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य

कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद खान म्हणाले, ‘आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत.’ पाकिस्तानचा आमच्याशी कधीही संबंध नव्हता. पाकिस्तान नेहमीच आपला शत्रू राहिला आहे. जर मोदी, अमित शहा आणि केंद्र सरकारने मला परवानगी दिली तर मी पाकिस्तानात जाऊन युद्ध करण्यास तयार आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना एक आत्मघातकी बॉम्ब देण्यास सांगितले, जो ते त्याच्या शरीरावर बांधतील आणि पाकिस्तानात जाऊन त्यांच्यावर हल्ला करतील. 

अल्लाहची शपथ घेतो की…

जमीर अहमद खान म्हणाले, ‘जर युद्ध झाले तर मी तयार आहे.’ एक मंत्री म्हणून मी म्हणत आहे की मी पाकिस्तानशी युद्ध लढण्यास तयार आहे. मी स्वतः भारताच्या वतीने युद्धात भाग घेण्यासाठी तिथे जाईन. गरज पडली तर मी आत्मघातकी बॉम्बरही बनेन. मी मस्करी करत नाहीये. देशाच्या हितासाठी, जर मोदी आणि शहा यांनी मला आत्मघातकी बॉम्बर बनवले तर मी अल्लाहची शपथ घेतो की मी बॉम्ब घालून पाकिस्तानात जाईन. कर्नाटकच्या मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि तो निष्पाप नागरिकांवरील घृणास्पद आणि अमानवी कृत्य असल्याचे म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here