दि.२८: एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बद्दल डॉ. जाहिद कुरेशी यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. डॉ. जाहिद कुरेशी हे समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील आहेत. शबाना कुरेशी यांच्याशी समीर वानखेडे यांचा पहिला विवाह झाला होता. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केल्याचा दावा केला होता. समीर वानखेडे यांनी धर्म बदलून नोकरी मिळविल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
डॉ. जाहिद कुरेशी यांनी माध्यमांसमोर येऊन समीर वानखेडे यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब मुस्लिम असल्यामुळेच माझी मुलगी शबाना तिचा विवाह त्यावेळी समीर यांच्याशी करण्यात आल्याचा दावा डॉ. जाहिद कुरेशी यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्या बहिणीचा विवाहही मुस्लिम समाजातील व्यक्तीशी झाल्याचा दावा कुरेशी यांनी केला आहे. समीर यांच्या आई स्वभावाने खूप चांगल्या होत्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.
समीर यांचे कुटुंब मुस्लिम असल्यामुळेच यांच्याशी आपल्या मुलीचा रहा करण्यात आल्याचा त्यांनी सांगितले. तसेच माध्यमात आल्यानंतरच समीर वानखेडे हे हिंदू असल्याचे आपल्याला कळल याचे जाहिद यांनी सांगितले. समीर वानखेडे हिंदू असताना त्यांच्याशी मुलीचं लग्न कसं लावलंत अशी विचारणा होत असल्यानं मी आमची बाजू मांडत आहे, असं म्हणत जाहीद कुरेशी यांनी वानखेडेंबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
२००६ मध्ये समीर आणि शबाना यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी समीर यांनी आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती मौलाना मुझम्मील अहमद यांनी दिली. मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा असल्याचंदेखील मौलानांनी म्हटलं आहे.