तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? असे तपासा

0

दि.२७: आधार कार्ड (Aadhar Card) हे महत्वाचे आहे. आधार कार्ड हे बँक खाते काढण्यापासून ते सिम कार्ड घेण्यापर्यंत सर्व ठिकाणी लागते. आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो की एलपीजी सिलिंडरचे अनुदान घ्यायचे असो, आधार क्रमांकाची जवळपास सगळीकडे मागणी केली जाते.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर तुम्ही हे सोप्या मार्गाने जाणून घेऊ शकता. आधार क्रमांक प्रसिद्ध करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे, हे तपासण्यासाठी खास सुविधा पुरवते आहे.

आधार प्रमाणीकरणचा इतिहास (ऑथेंटिकेशन हिस्ट्री) असा तपासा –

  • सर्वात आधी तुम्ही आधार क्रमांक प्रसिद्ध करणाऱ्या यूआयडीएआय (UIDAI)च्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://resident.uidai.gov.in.
  • यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री (Aadhaar Authentication History) वर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका.
  • त्यानंतर ‘जनरेट ओटीपी’ वर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहारांची संख्या (ट्रान्जॅक्शन) द्यावी लागेल.
  • आता निवडलेल्या कालावधीसाठी प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) विनंतीचे तपशील स्क्रीनवर दिसून येतील.

तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या वापरामध्ये काही गैरवापर झाल्याचा संशय असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास तुम्ही ताबडतोब यूआयडीएआय (UIDAI) टोल फ्री क्रमांक – १९४७ वर किंवा help@uidai.gov.in येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here