Russia Ukraine War: ‘तुम्ही भारताला पत्र नाही पाठवले, मग तुम्ही आम्हाला गुलाम समजलात का?’, इम्रान खान युरोपीय देशांवर संतापले

0

दि.7: Russia Ukraine War: पाश्चात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या वतीने पाकिस्तानला (Pakistan) पत्र लिहून युक्रेनवरील (Ukraine) रशियन (Russia) हल्ल्याचा निषेध करण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरात पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तान हा पाश्चात्य देशांचा गुलाम नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, जेव्हा भारताने (India) काश्मीरचा (Kashmir) विशेष दर्जा रद्द केला होता, तेव्हा या देशांनी भारतावर निर्बंध का लादले नाहीत?

पाकिस्तान आपली आज्ञा पाळणारा पाश्चात्य देशांचा गुलाम नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी रविवारी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील पाश्चात्य देशांच्या दूतावासांनी पाकिस्तानला युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा (Russia Ukraine War) निषेध करण्याची आग्रह केला. यानंतर इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख करत त्यांच्या आग्रहाला कडक शब्दात उत्तर दिले आहे. इम्रान खान म्हणाले की, जेव्हा भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला, तेव्हा कोणत्याही पाश्चात्य देशाने भारतासोबतचे संबंध का तोडले नाहीत.

पाकिस्तानस्थित युरोपियन युनियनच्या सदस्य देशांसह 22 राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी संयुक्तपणे 1 मार्च रोजी पाकिस्तानला पत्र लिहिले. युक्रेनमधील रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाला पाठिंबा देण्याचे आवाहन पाकिस्तानला पत्रात करण्यात आले आहे. हे पत्रही जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आले जे सहसा केले जात नाही.

यामुळे संतापलेल्या इम्रान खान यांनी एका राजकीय सभेत आम्ही पाश्चात्य देशांचे गुलाम नाही, असे म्हटले होते. ते म्हणाले, ‘मला युरोपियन युनियनच्या राजदूतांना विचारायचे आहे. तुम्ही भारताला असे पत्र लिहिले का?’

काश्मीरचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा भारताने काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा मोडला… काश्मीरचा विशेष दर्जा संपवणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांच्या विरोधात जाऊन, तुमच्यापैकी कोणी भारताशी संबंध तोडले का? ? त्यांच्यावर काही निर्बंध लादले आहेत का? मग आम्ही तुमच्या समोर काय आहोत? आम्ही काही गुलाम आहोत की तुम्ही म्हणाल तसे करावे?’

रॅलीदरम्यान त्यांनी अफगाणिस्तानचाही उल्लेख केला आणि सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने पाश्चिमात्य देशांच्या लष्करी गटबंधन नेटोला पाठिंबा दिला, परंतु पाकिस्तानबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी नेटो देशांनी पाकिस्तानवर टीका केली.

संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तान मतदानापासून दूर राहिला. पाकिस्तानप्रमाणेच भारत, चीन या देशांनीही मतदानात भाग घेतला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here