राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांची पोस्ट व्हायरल, भाजपला किंवा एनडीएलाही…

0

सोलापूर,दि.14: राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांची पोस्ट व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणूक 2024 सात टप्प्यात मतदान होत आहे. 13 मेला चौथ्या टप्प्याचे मतदान झाले आहे. या निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा दिली आहे. मात्र ही निवडणूक भाजपाला सोपी नाही असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, राजकीय विश्लेषकांनी आपापले आडाखे मांडायला सुरुवात केली असून त्यातील एक विश्लेषण सध्या भलतंच व्हायरल होत आहे. या विश्लेषणानुसार भाजप आणि एनडीएला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या तुलनेने यंदा किती जागा मिळतील, ते सांगण्यात आलं आहे. भाजपला आणि पर्यायाने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळणार नसल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स पोस्टवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्ष व एनडीएला 2019च्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पदरात किती मतं पडतील, यासंदर्भात त्यांनी भाकित वर्तवलं आहे. त्यात यादव यांनी भाजपला किंवा एनडीएलाही बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

भाजपाला बहुमत मिळणार नाही

योगेंद्र यादव यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये लोकसभा निवडणूक निकालांबाबत लिहिलं आहे की, या व्हिडीओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे, जे जाणून-बुजून लपवलं जात आहे. ते सत्य म्हणजे या लोकसभा निवडणुकीने रोख बदलला आहे. भारतीय जनता पक्षाला यंदा बहुमत मिळणार नाही. भाजपला बहुमत मिळणार नाही. भाजप 272च्या खूप खाली आहे. एनडीएही 272च्या जादुई आकड्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे, असं म्हणत त्यांनी मोदींच्या अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहनही केलं आहे.

2019मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या आणि एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी या जागांमध्ये चांगलीच घट होईल. त्यामुळे भाजप यावेळी 400 पार जाणार हा अपप्रचार आहे, मतदारांनी त्याला बळी पडू नये, असं यादव यांचं म्हणणं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here