नवी दिल्ली,दि.9: World Cup 2023: विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पहिल्याच सामान्यात अनेक रेकॉर्ड केले आहेत. वर्ल्ड कपमध्ये काल भारताची पहिली मॅच. ऑस्ट्रेलियाविरोधात सामना. टीम इंडियाची सुरुवात काही चांगली झाली नाही. पण विराट कोहलीने मात्र भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत तारलं. यासोबतच त्याने अनेक रेकॉर्डही केले.
विराट कोहलीने केले अनेक रेकॅार्ड | Word Cup 2023
वनडेच्या क्रिकेटच्या इतिहासात नंबर-3वर खेळत विराट कोहलीने सर्वाधिक वेगवान 11000 रन्स पूर्ण केले आहेत. आशियातील तो एकमेव खेळाडू आहे, जो वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार रन्सच्या आकड्यावर पोहोचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीशिवाय याआधी असं करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पोंटिंग आहे.
याशिवाय कोहलीने सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडला आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये त्याने सर्वात जास्त रन्स बनवले आहेत. सचिनने 58 डावात 2719 धावा केल्या होत्या. तर विराटने 64 व्या डावात 2720 धावा करत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
इतकंच नव्हे तर कोहलीने कॅचचाही इतिहास रचला आहे. स्लीपमध्ये त्याने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्येच शानदार फिल्डिंग दाखवली. कोहलीने आपल्या उजव्या बाजूला गुलाटी मारत कॅच पकडली. पहिल्या उडीत दोन्ही हातांनी कॅच केलं आणि त्यानंतर आणखी एक गोलांटी मारली.
वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या ओपनरला खातं न उघडता शून्यावरच आऊट केलं, असं पहिल्यांदाच घडलं.