करमाळा,दि.30: केन्द्र शासन प्रणित, आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना येत्या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतमाल प्रक्रिया आणि कृषी पूरक व्यवसाय यांचेसाठी ही योजना आणली आहे. या योजनेत करमाळा तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी करमाळा, संजय वाकडे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करमाळा यांच्यावतीने लाभार्थी अर्ज सादरीकरण भव्य अशी कार्यशाळ आयोजित केली होती, या कार्यक्रमाला 162 महीला बचतगट, कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.
योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळींशी जोडणी व त्याद्वारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे. योजना बँक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के व कमाल 10 लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय आहे.
नवीन प्रक्रिया उद्योग उभारल्यास या योजनेतून अनुदान मिळते. ज्वारी व्यतिरिक्त इतर कार्यरत प्रक्रिया उद्योग असेल तर त्याच्या विस्तारीकरण, स्तरवृध्दी,आणि आधुनिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. वैयक्तिक लाभार्थी, गट संस्था, सहाय्यता गट, शेतकरी उत्पादन कंपनी, संस्था उत्पादक, सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.”
या योजनेसबंधी अर्ज करण्यासाठी मनोज बोबडे
यांच्याशी संपर्क साधावा 9881651012 किंवा कृषी विभाग करमाळा सर्व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.