गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या घरावर बुलडोझर चालवणार का? एआयएमआयएमचा सवाल

0

भिवंडी,दि.४: गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या घरावर बुलडोझर चालवणार का? असा सवाल एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफार कादरी यांनी केला आहे. भिवंडीत ते माध्यमांशी बोलत होते. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला रात्री पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

माध्यमांशी बोलताना अब्दुल गफार कादरी म्हणाले, ‘राज्यात कायदा सुव्यवस्थेचे ठेकेदार असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला बिहारच्या वाटेवर घेऊन निघाले आहेत. मीरा भाईंदर येथील गरीब मुस्लिम समाजावर बुलडोझर चालवणारे, पोलिस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या घरावर बुलडोझर चालवणार का?’

अजित पवार यांना भाजपाने जशी क्लिनचीट दिली तसे गोळीबार करणाऱ्या गायकवाड याला ही क्लिनचीट देतील. आमदार गायकवाड यांच्या घरावर बुलडोझर चालवून दाखवावा, असे आव्हान कादरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here