IPL 2022 मध्ये महेंद्रसिंग धोनी खेळणार का?

0

दि.१७: IPL २०२१ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने जेतेपद पटकावले. चेन्नईचे हे एकूण चौथे विजेतेपद ठरले आहे. महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल २०२२मध्ये पिवळ्या जर्सीमध्येच म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या लिलावात पहिले रिटेन्शन कार्ड फक्त धोनीसाठी वापरले जाईल, असे सीएसकेने स्पष्ट केलं आहे. आयपीएल २०२१चे जेतेपद जिंकल्यानंतर प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेशी केलेल्या संभाषणावेळी आयपीएल २०२२मध्ये खेळण्याबाबतचे संकेत दिले होते. क्रिकेटचा वारसा सोडणार का असा प्रश्न हर्षा भोगलेंनी विचारला होता. त्यावर बोलताना धोनी म्हणाला की, मी आताच असे काही करणार नाही.

त्यानंतर आता चेन्नई संघ व्यवस्थापनानेही धोनीच्या त्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, “खेळाडूंना कायम ठेवण्यात येईल हे खरे आहे, पण किती खेळाडूंना कायम ठेवता येईल, याबाबत काही ठरलेले नाहीय. खरं सांगायचं झालं तर रिटेन्शनची प्रक्रियेचा धोनीवर काही परिणाम होणार नाही. त्याच्यासाठी ही दुय्यम गोष्ट असेल. आम्ही त्याच्यासाठी आमचे पहिले रिटेन्शन कार्ड वापरू. सीएसकेला त्यांच्या कर्णधाराची गरज आहे आणि तो पुढच्या वर्षी खेळेल, याचाही हा पुरावा आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here